शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जिल्हा सिमेवर वाहन तपासणी ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जिल्हा सिमेवर वाहन तपासणी यासह विविध कामांचा ताण पुन्हा वाढल्याने, पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या असा सूरही उमटत आहे. आरोग्याची काळजी घ्या, लवकर घरी या, अशी आर्त हाकही कुटुंबातील सदस्य देत आहेत.

कोरोनाच्या दुसºया लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीची नवीन नियमावली लागू झाली असून, अंमलबजावणीसाठी पोलीस पुन्हा तैनात झाले आहेत. जिल्ह्यात सव्वा दोन हजारावर पोलीस कर्मचारी असून, जिल्हाबंदी नियमाची अंमलबजावणी म्हणून जिल्हा सिमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरातील प्रमुख चौक, प्रमुख मार्ग यासह प्रतिबंधित क्षेत्र व ग्रामीण भाग अशा सर्वच ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. कोरोनाकाळात चोख कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचारी व अधिकाºयांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. आतापर्यत जवळपास २८६ जणांना कोेरोना संसर्ग झाला असून, एकाचा मृत्यूही झाला. कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना इतरांपासून आपल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे तसेच शासनानेदेखील आवश्यक ती किट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अपेक्षीत आहे.

००

बाबा, लवकर या, आम्ही घरी वाट पाहतोय... !

कोरोना विषाणू संसर्ग असल्याने प्रत्येकजण काळजी घेऊन जास्तीत जास्त वेळ घरातच राहत आहेत. पप्पा ड्यूटीवरून घरी परत कधी येतात याची वाट बघत असतो.

आयूष संतोष पाईकराव

००००

कोरोनामुळे इतरांचे बाबा आॅफिस आटोपून लवकर घरी येतात. आमच्या पप्पाला मात्र दिवसभर रस्त्यावरच डयूटी करावी लागते. पप्पा घरी कधी येतात, याची वाट आम्ही बघत असतो.

मानवी मनोहर वानखडे

००००

कोरोना विषाणू संसर्ग होणार नाही याची दक्षता पप्पाकडून घेतली जाते. आरोग्याची काळजी घ्या, असे आम्हीही त्यांना सांगत असतो. घरी लवकर या, असा हट्टही त्यांच्याकडे धरत असतो.

निधी विनोद मारकंडे

००

कोरोनाकाळातही पप्पा दिवसभर ड्यूटी करीत असल्याने थोडीही चिंताही असते. आम्ही सर्व वाट बघत आहोत, तुम्ही लवकर घरी या असे फोन करून त्यांना सांगत असतो.

आयुष मिलिंद गायकवाड

००००

लसीकरण...

एकूण पोलीस नोंदणी २१६२

पहिला डोस घेणारे १८८७

दुसरा डोस घेणारे १४१३

एकही डोस न घेणारे २७५

०००००

२८६ पोलीस पॉझिटिव्ह

एकूण कोरोनाबाधित पोलीस २५९

सध्या उपचार सुरू असलेले पोलीस ११

एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी २६

सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी २

मृत्यू ०१

००००