शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी कारंजात पकडले ६४ ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : एकिकडे बाधितांसह कुटुंबियांची ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ होत असताना, दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कारंजा लाड : एकिकडे बाधितांसह कुटुंबियांची ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ होत असताना, दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणारे वाहन संशयास्पदरित्या आढळल्याचा प्रकार कारंजा शहरात सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर-औरंगाबाद शीघ्रगती मार्गावरील कारंजा येथील यशोतिरथ काॅलनीमधील महाराष्ट्र नगरातील एका ठिकाणी संशयितरित्या एका पिकअपमधून ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, याठिकाणी (एमएच २९ एटी ०८१८) क्रमांकाच्या पिकअपमधून (एमएच २१, ६००१) क्रमांकाच्या ट्रकमध्ये काहीजण ऑक्सिजन सिलिंडर भरताना दिसून आले. याबाबत खात्री केली असता, पिकअपमध्ये २९, ट्रकमध्ये २६ तर संबंधित दुकानात ९ रिकामे सिलिंडर आढळले. दुकानमालक रियाज अहेमद गुलाम रसुल (४०, रा. झोया नगर, कारंजा) यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे सिलिंडर व्यवसायाचा परवाना असून, हा परवाना न्यू हिंदूस्थान एजन्सी, नागपूर-औरंगाबाद हायवे, महाराष्ट्र नगर, कारंजा या नावे असल्याचे दिसून आले. तसेच सिलिंडरबाबत विचारणा केली असता, त्यांनी हे सिलिंडर नागपूर येथून खरेदी केल्याचे सांगितले. कागदपत्रांची विचारणा केली असता, हे सिलिंडर जवाहर हाॅस्पिटल, कारंजाच्या नावे खरेदी केल्याचे दिसून आले. यावेळी अधिक विचारपूस केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा मुद्देमाल कारंजा शहर पालीस स्थानकात जमा करण्यात आला आहे. या कारवाईचा जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजय वाढवे, किशोर चिंचोडकर, अमोल इंगोले, मुकेश भगत, प्रवीण राऊत व राम नागुलकर यांनी केली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे कारंजावासीयांचे लक्ष लागले आहे.