मंगरूळपीर : स्थानिक पोलिस स्टेशन परिसरातील वसाहतीमधील निवासस्थानांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ३७ पैकी केवळ १९ निवासस्थानांत पोलसि शिपायांचे वास्तव्य आहे. उर्वरीत निवासस्थानांना भूत बंगल्याचे स्वरुप आले असून जनतेचे संरक्षण करणार्या शिपायांच्या कुटूंबियांचा जीवन पडक्या घरांमुळे धोक्यात आले आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस खात्यांने घेण्याची गरज आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.मंगरुळपीर पोलिस वसाहत काही वर्षापूर्वी गजबजलेली होती. मात्र मागील काही काळांपासून सदर निवासस्थानांची डागडुजी होत नसल्याने अनेक शिपायांनी आपले कुटूंब सुरक्षीत राहावे म्हणून भाड्याच्या खोलीत वास्तव्याला गेले तर काही आपल्या सोयी नुसार अप डाऊन करतांना दिसतात या पोलिस वसाहतीमध्ये एकूण ३८ निवासस्थाने आहेत. त्यापैकी एका निवासस्थानात एका उपविभागीय पोलिस अधिकार्यांचे कार्यालया थाटण्यात आलेले आहे तर ५ निवासस्थानांवर चक्क टिनपत्रे टाकण्यात आले आहेत. १९ कूटूंब या वसाहतीमध्ये राहत आहेत. उर्वरीत निवासस्थानांची अवस्था भूत बंगल्या सारखी बनलेली दिसून येत आहे.
पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था
By admin | Updated: May 12, 2014 23:21 IST