मंगरुळपीर : गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील ढोणी शेतशिवारातील गावठी दारू अड्डय़ावर छापा मारून आसेगाव पोलिसांनी ८५१0 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २ मे रोजी रात्री ७ वाजतादरम्यान करण्यात आली. आसेगाव पोलिसांनी ग्राम ढोणी शेत शिवारात आनंदा गंगाराम मोरे याचे शेतातील झोपडीतून पाच लीटर गावठी हातभट्टीची दारू व २0४ लीटर सडवा मोहा माच असा एकूण ८५१0 रुपयाचा दारूचा माल जप्त केला. सदरची कारवाई ठाणेदार एस.पी. अंबुलकर व पोलीस कर्मचारी गोपाल ज्ञानेश्वर राठोड, बबलू मोकाडे, शब्बीर गौरवे, फिरोज भुरीवाले यांनी केली. आरोपी आनंदा गंगाराम मोरे यास ताब्यात घेऊन आसेगाव पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई फ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार एस.पी. अंबुलकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव डाबेराव करीत आहेत.
गावठी दारू अड्डय़ावर पोलिसांचा छापा
By admin | Updated: May 4, 2015 01:09 IST