शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यानेच केली वैमनस्यातून हत्या!

By admin | Updated: June 7, 2017 01:47 IST

तीन आरोपींना अटक : अंजनखेडा खून प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच तथा कंत्राटदार बबन भागवत पायघन (वय ५०) यांची हत्या गावातीलच प्रवीण केशव पायघन याने दोघांच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले. या तिघांनाही ६ जून रोजी अटक केली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन पायघन यांची २६ मे रोजी हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, सुनील अंबुलकर, एस.एम. मानकर, तपास अधिकारी वाठोरे, सहायक पोलीस निरीक्षक वाढवे, किरण साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आरोपींचा शोध लावण्यात यश प्राप्त केले. पायघन यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार चाकी वाहनाचा शोध लागल्याशिवाय आरोपिंचा शोध घेणे अशक्य होते. त्यामुळे सर्वप्रथम गुन्ह्यात वापरण्यात आलेले चार चाकी वाहन शोधण्यात तपास अधिकारी वाठोरे व राजेश बायस्कर यांना यश आले. मारेकऱ्यांचा मुख्य धागा हाती लागल्यामुळे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेचा मुख्य सूत्रधार असलेला पोलीस शिपाई प्रवीण केशव पायघन व वाहन चालक ओमप्रकाश दीपक रोहणकर (रा. नागपूर) यांना तत्काळ अटक करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मुख्य आरोपी पायघन याने वाशिम तालुक्यातील तांदळी बु. येथील दीपक लक्ष्मण कांबळे याचासुद्धा या खून प्रकरणात समावेश असल्याचे उघड झाले. कांबळे याला अटक करण्यासाठी पोलीस पथक तांदळी बु. येथे गेले असता, पोलीस आल्याची चाहूल लागताच कांबळे याने घरावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरविण्यात पोलीस शिपाई ज्ञानदेव म्हात्रे यांना यश आले. अटक केलेल्या तीनही आरोपींना आज वाशिम जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी तीनही आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींकडून मृत पायघन यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, मृताच्या हातामधील अंगठ्या व सोनसाखळी जप्त करणे बाकी आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाठोरे करीत आहेत. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील रूजू झाल्यापासून कारंजा व वाशिम तालु्क्यात दोन उपसरपंचाच्या हत्या झाल्या. या दोन्हीही हत्येचा तपास करणे अतिशय कठीण होते; परंतु पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वत: लक्ष घालून दोन्ही हत्येचा उलगडा केला.