वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव येथे एका जुगार अड्डय़ावर आसेगाव पोलिसांनी २ मे रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये जुगार साहित्यासह रोख ११६0 रुपये जप्त करून एकाला अटक करण्यात आली. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी शेंदुरजना अढाव येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्डय़ावर पोलिसांच्या पथकासह छापा टाकला. या छाप्यामध्ये मनोहर होरासिंग राठोड याच्याकडून वरली मटक्याचे साहित्य व रोख ११६0 रुपये जप्त करून राठोड याला अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या पथकामध्ये ठाणेदार अंबुलकर यांच्यासह सहाय्यक फौजदार शेषराव डाबेराव, ज्ञानेश्वर राठोड, फिरोज, शब्बीर गौरवे या पोलीस कर्मचार्यांचा समावेश होता.
पोलिसांचा जुगार अड्डय़ावर छापा
By admin | Updated: May 3, 2015 02:17 IST