शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील आठही आरोपींना पोलिस कोठडी

By admin | Updated: September 4, 2014 23:04 IST

अमानवाडी घाटातील गोळीबार; आठही जणांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडी.

वाशिम : जउळका रेल्वे पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अमानवाडी ते माळेगाव दरम्यानच्या घाटात भरदिवसा सोनारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आठही जणांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ४ सप्टेंबर रोजी न्यायाधिशांनी दिले.अकोला जिल्ह्यातील धाबा येथील येथील सोनार संतोष वाटाने हा १३ ऑगस्ट रोजी अमानवाडी येथे भरणार्‍या आठवडी बाजाराच्या निमीत्ताने आपला माल घेवून विक्रीसाठी जात होता. माळेगाव ते अमानवाडी दरम्यानच्या घाटातून भर दूपारी तो जात असतांना त्याच्यावर पाठिमागून गोळीबार झाला होता. या गंभीर व थरारक घटनेप्रकरणी हरकतीत आलेल्या पोलिसांनी तपासचकक्रे वेगाने फिरवीली होती. अकोला शहर पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार उर्फ राज यादव हरिहर पेठ अकोला, उमेश जोंधळे लोहगड ता. बार्शिटाकळी, उमेश सोळंके कोळसा ता. बाळापूर, अमोल साळवे क्रांतीनगर शिवणी शिवार, अमोल जामनीक बार्शिटाकळी, पवन गावंडे बाळापूर रोड अकोला, राहूल शर्मा जुने शहर अकोला, भिका मुळे सावना ता. मेहकर या आठ जणांना अटक केली होती. यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जीवंत काडतूस, काळ्य़ा रंगाची यामाह व लाल रंगाची बजाज दूचाकी जप्त केली होती. अकोला पोलिसांकडून आठही जणांना ताब्यात घेतल्यानंतरच्या तपासात २ खाली काडतूस सापडले आहेत. ताब्यात घेतलेल्या आठही आरोपिंचा अमानवाडी माळेगाव दरम्यान धाबा येथील सोनारावर झालेल्या गोळीबारप्रकरणाशी संबंध असल्याची दाट शक्यता जउळका रेल्वेचे ठाणेदार प्यारसिह मानलवी यांनी व्यक्त केली.