शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

युवक मृत्यूप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: March 6, 2017 02:30 IST

सावरखेड फाट्यानजिकच्या आढळला होता मृतदेह; चार आरोपींना १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

मालेगाव, दि. ५- येथील युवक नितीन रुस्तम कांबळे (वय ३0 वर्षे) याच्या मृत्यूप्रकरणी मालेगाव पोलिसांनी ४ मार्चला चार संशयित आरोपींना ताब्यात घेत ५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, की मेडशी आणि पातूरच्या सीमेवर येणार्‍या सावरखेड फाट्यानजिकच्या शेतात शुक्रवार, ३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास युवकाचा मृतदेह आढळून आला. तो मेडशी येथील नितीन कांबळे याचा असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. याप्रकरणी शनिवार, ४ मार्चला सकाळी मेडशी येथील तलाठी कोल्हे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून याप्रकरणी बुर्‍हाण युनूस पठाण, अकबर युनूस पठाण, राजू विष्णू साठे आणि निजाम छोटू जान पठाण या चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना ५ मार्च रोजी मालेगाव येथील न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौघांनाही १0 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.तथापि, हे प्रकरण घातपाताचे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. लवकरच प्रकरणाचा छडा लागेन, असे संकेत मालेगाव पोलिसांनी दिले.