शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अन् गणेश मंडळे झाली ‘अलर्ट’

By admin | Updated: September 3, 2014 21:30 IST

लोकमत स्टींग ऑपरेशनचा प्रभाव; वाशिम पोलिस विभाग,गणेश मंडळे झाला अलर्ट.

वाशिम : गणरायांच्या मुर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत पोलिस यंत्रणा थोडी गाफीलच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने उघड केले होते. ३0 ऑगस्टच्या रात्री १0 ते १ वाजेदरम्यान लोकमत चमूने, वाशिम शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्यावतिने चर्चा करून १ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत व २ सप्टेंबर रोजी प्रत्येक मंडळाला पोलीस भेट डायरी देवून गणरायाच्या सुरक्षिततेची दखल घेण्यात आली. याला गणेश मंडळानेही प्रतिसाद देवून मंडळाच्यावतिनेही दखल घेण्याचे आश्‍वासन दिले.वाशिम शहरात ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जात असल्याचा दावा पोलिस प्रशासन करीत असते. वाशिम शहरातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलिस गस्त व पोलिस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. यावेळी ६ गणेश मंडळातर्फे कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले होते. याचे सचित्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी ताबडतोब संबधितांना पाचारण करून यावर चर्चा केली. चर्चेत प्रत्येक गणेश मंडळाजवळ एक डायरी ठेवण्याचे ठरविण्यात आले. या डायरीवर रात्रीच्यावेळी कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी या भागात जावून संपूर्ण पाहणी केल्यानंतर यावर शेरा लिहणार आहे. तसेच प्रत्येक गणेश मंडळ पदाधिकार्‍यांना सुध्दा याबाबत कल्पना देण्यात आली असून मंडळानी ही जागृत राहण्याचे पोलीस विभागाने कळविले आहे. पोलीसांनी गणेश मंडळांना भेट देवून डायरी व सूचना केल्याने पोलीस गणरायाच्या सुरक्षिततेबाबत जागृत असल्याचे दाखवून दिले. जेव्हा पोलीस विभागाचे कर्मचारी गणेश मडळाला डायरी देण्यासाठी गेले तेव्हा मंडळाने लोकमतमुळे हा उपक्रम सुरू झाला यामुळे सदर कर्मचार्‍यांजवळ बोलून दाखविल्याचे डायरी देणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले.*लोकमतचे कौतूकगणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरीता २ सप्टेंबर रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शांतता समितीच्या बैठकीत मान्यवरांनी लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून होणार्‍या अनुचित प्रकाराबाबत अवगत केल्याबद्दल लोकमतचे कौतूक केले.