कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान येथे राम नवमी अर्थात २१ एप्रिल २०२१ रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्रुांनी १२ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केला. तसेच आता पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज संस्थान व उमरी खुर्द (ता. मानोरा) केंद्रस्थानी ठेवून चारही दिशांना ५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध घालून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाहेर जिल्ह्यातून पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या भाविकांसाठी सीमाबंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी संबंधित महंत, महाराज व संबंधित ट्रस्ट यांनी यात्रा रद्द असल्याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल.
पोहरादेवी यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST