शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात साडेचार लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 8, 2017 01:37 IST

विविध शसकीय विभाग व संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सामाजिक वनीकरणसह वन विभागाशी निगडित कार्यालयांना ७ जुलैपर्यंत १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असताना, त्यांच्याकडून ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्षांची लागवड केली. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या १०९.३० टक्के आहे. सामाजिक वनीकरण व वन विभाग सोडून इतर विभागांनीही त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के वृक्ष लागवड केली आहे. जिल्ह्यात ७ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ४ लाख ६६ हजार ९१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेला जिल्ह्यातील विविध शासकीय विभागासह शाळा, महाविद्यालये, सामाजिक , स्वयंसेवी संस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासनाच्या मोहिमेत सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या विविध शाखांसाठी १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यांच्याकडून या वृक्ष लागवडीसाठी विविध स्थळांची निवड करून, २ लाख २७ हजार ८१० खड्डे खोदण्यात आले आणि त्यापैकी २ लाख ६ हजार ७५० खड्ड्यांत ७ जुलै २०१७ च्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण निर्धारित वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या १०९.३९ टक्के आहे. सामाजिक वनीकरणसह वन विभागाच्या विविध शाखा सोडून जिल्हाधिकारी वाशिम यांनी जिल्ह्यातील इतर विभागांसाठी ३ लाख १८ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी ३ लाख ५१ हजार १८९ खड्डे खोदण्यात आले. यातील २ लाख ५९ हजार ३४१ खड्ड्यांत वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वृक्ष लागवड उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ८ जुलै रोजी वन विभागाकडून अद्ययावत होणाऱ्या आकडेवारीत हे प्रमाण निश्चित शंभर टक्क्यांच्यावर असेल, असा विश्वास अधिकारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला आहे.