कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक महेश देवळे यांनी केली. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष विनायक जाधव, शाळेच्या कोषाध्यक्ष ज्योती जाधव, शाळेच्या प्राचार्या मेघा वैष्णव, पोदार जम्बो किड्सच्या प्रमुख सीमा मापारी, सचिन मापारी, शाळेचे प्रशासक पवन जाधव व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते एक झाड लावून त्याला जोपासण्याचा संकल्प करण्यात आला. निमित्ताने शाळेच्या अध्यक्षांनी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केेले. तसेच सर्वांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व सध्याची कोरोना संसर्गजन्य परिस्थिती पाहता सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक महेश देवळे यांनी केले.
पोदार लर्न स्कूलमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST