शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तालुकानिहाय प्रत्येकी ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:30 IST

Washim News : यापुढे प्रत्येक तालुक्यात दैनंदिन ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आहे. 

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. मध्यंतरी चाचण्यांची संख्या घटली होती. खबरदारी म्हणून यापुढे प्रत्येक तालुक्यात दैनंदिन ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आहे. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९३४ होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जून महिन्यात १३५१ रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात १४ दिवसांत १६६ रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात दैनंदिन सरासरी १४३१, एप्रिलमध्ये १२९५, तर मेमध्ये २२६५ चाचण्या झाल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने चाचण्यांची संख्यादेखील कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने गाफील राहून चालणार नाही, या भूमिकेतून जिल्हा प्रशासनाने दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार तालुकानिहाय दैनंदिन ३०० याप्रमाणे जिल्ह्यात १८०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आरोग्य विभागातर्फे सुरू आहे. नागरिकांनीदेखील सर्दी, ताप किंवा खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसताच नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे.

दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तालुकानिहाय दैनंदिन ३०० कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असून, नागरिकांनीदेखील लक्षणे दिसून येताच चाचणी करावी.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या