कारंजा : कारंजा खेर्डा गावाजवळ रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.
या खड्ड्यामुळे दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दुचाकी वाहनधारकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. जालना ते वर्धा रस्त्याचे काम करण्यासाठीची निविदा व्हि.पी. शेट्टी कंपनी जालना यांना देण्यात आली असून, त्यांनी काम सुरू असताना रस्त्यावरील असलेले मोठमोठे खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, असे असतांनासुध्दा संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. खेर्डा कारंजा गावानजीक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांचा अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी सामाजिक संघटनेकडून होत आहे.