शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन अद्याप नादुरूस्त !

By admin | Updated: May 17, 2017 19:35 IST

राजूरा (वाशिम) : रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

राजूरा (वाशिम) : जिल्हा विकास योजना या शिर्षाअंतर्गत करण्यात आलेल्या रिधोरा ते गोकसावंगी या रस्ता कामादरम्यान रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईनची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.रिधोरा ते गोकसावंगी या रस्त्याचे सुरुवातीचे एक किमी काम करीत असताना रिधोरा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तोडफोड झाली. सदरहू पाईपलाईन दुरुस्ती करण्याबाबत कंत्राटदाराने लेखीपत्र तपास अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते. त्याला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला. मात्र, दुुरुस्तीचे काम झाले नाही परिणामी ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.रस्ता दुरुस्तीचे काम करीत असताना कंत्राटदाराने नियमानुसा रस्त्यावर गिट्टी व मुरुम टाकलेला नाही. शिवाय कामाची पाणी टाकून दबाई करण्यात आलेली नाही, असा आरोप भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष संदीप सावळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केला. या रस्ता कामासाठी वापरलेल्या गौण खनिजाच्या रॉयल्टीची रक्कम महसूल विभागाकडे जमा करण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आलेले गौणखनिज व प्रत्यक्ष वापरण्यात आलेल्या गौणखनिजाच्या ब्रासमध्ये मोठया प्रमाणात तफावत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावळे यांनी केली.दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मालेगाव येथील उपअभियंता व्ही.व्ही. आपोतीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की पाईपलाईन तोडफोडीची दुरूस्ती करून देण्याची ग्वाही संबंधित कंत्राटदाराने लेखी स्वरुपात दिलेली आहे.