धनंजय कपाले / वाशिम
नोकर भरतीतील गौडबंगालाचे लोकमतने पोस्टमार्टेम करताच जिल्हा परिषदेचे प्रशासन खळबळून जागे झाले. लोकमतच्या दणक्यामुळे प्रशासनाने ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेली औषध निर्माण अधिकार्याची परिक्षा रद्द असुन ही परिक्षा आता ३0 नोव्हेंबर रोजी नव्याने घेण्यात येणार आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी जवादे यांनी या बाबीला दुजोरा दिला. वाशिम जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणार्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे कंत्राट प्रथम सिग्मा या एजन्सीला देण्यात आले होते. काही विशिष्ट पदाची परिक्षा झाल्यानंतर १0 नोव्हेंबर रोजी लागलीच दुसर्या एजन्सीला ओएमआर एजन्सीचे कंत्राट देण्यामागचे कारण अद्यापही जिल्हा प्रशासन स्पष्ट करू शकले नाही. यामागचा अर्थ एकच की सिग्मा एजन्सीच्या एजंटने एखाद्या मोठय़ा अधिकार्याचा खांदा वापरून गौडबंगाल केल्याचे अधोरेखीत होत आहे. जिल्हा परिषद पदभरतीमध्ये घेण्यात येणार्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणी करण्याचा कंत्राट मुंबई येथील सिग्मा कं पनीला देण्यात आला होता. हा कंत्राट मिळविण्यासाठी अमरावती येथील एका एजंटच्या विशेष प्रेमापोटी त्याला आशिष प्रदान करण्यात आले. मात्र त्याच्यावर केलेल्या एकतर्फी प्रेमाचा घात झाल्याने सर्व गौडबंगाल चव्हाट्यावर आले. ह्यसिग्माह्ण ने घात केल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवड समितीला ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या औषध निर्मात्याची परिक्षा पुन्हा ३0 नोव्हेंबर रोजी घेण्याची नामुष्की आली. अशाप्रकारचा घोळ १0 नोव्हेंबर पुर्वी पार पडलेल्या इतरही परिक्षेमध्ये झाल्याच्या चर्चेलाही आता उधान आले आहे. त्यामुळे निवड समितीने १0 नोव्हेंबर पुर्वीच्या सर्वच परिक्षा रद्द करून नव्याने सर्वच पदाच्या परिक्षा घेतल्या तर त्यांच्यावरील होणारा आक्षेप काही प्रमाणात कमी होईल. हे मात्र तितकेच सत्य.