शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नदी-नाल्यांवर पूल उभारणीचा प्रश्न प्रलंबित!

By admin | Updated: June 27, 2017 10:24 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र : थोड्याथोडक्या पावसानेही उद्भवतेय पूरस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातून वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर पूल उभारण्याचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागणे आवश्यक होते. असे असतापना त्याकडे लक्ष पुरविल्या गेले नाही. त्यामुळे थोड्याथोडक्या पावसानेही अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातून गेलेल्या १०६.१० किलोमिटरच्या प्रमुख राज्यमार्गावर ४० मोऱ्या आणि रपटे असून २५ लहान आणि दोन मोठे पूल आहेत. यादरम्यान वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीवरील पुलाची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय ४७७.७१ किलोमिटरच्या राज्यमार्गावर ३८९ मोऱ्या आणि रपटे असून ११८ लहान आणि ७ मोठे पूल आहेत. जिल्ह्यातील एकलासपूर गावानजिकच्या पुलावरून पावसाळ्यात पुराचे पाणी जात असल्याने या पुलाची उंची वाढविणे अत्यावश्यक ठरत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा ह्यजैसे थेह्ण आहे. तथापि, तुलनेने रस्ता समांतर झालेल्या छोट्या स्वरूपातील पुलांमुळे पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील नागपूर-औरंगाबाद दृतगती मार्गावरील पूल, जांब या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल, मंगरूळपीर-अनसिंग मार्गावरील पूल, रिसोड ते मेहकर रस्त्यावरील पूल, शिरपूर येथील पूल जमीन समांतर झाल्याने त्यावरून पावसाचे पाणी वाहून पुरपरिस्थिती निर्माण होते. यासह जवळपास ३५ गावांचा तालुकास्थळाशी असलेला संपर्क तुटतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्वाच्या बाबीकडे लक्ष पुरवून प्रलंबित असलेली पुलांची कामे पूर्ण करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरत आहे. वाशिम जिल्ह्यातील धोकादायक अवस्थेतील ६६ पुलांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रशासकीय मान्यता आणि शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली जातील. - के.आर.गाडेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम