शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

मेडशी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील ७ हजारपेक्षा शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच ...

मेडशी : गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील ७ हजारपेक्षा शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेची मदत मिळाली, तर उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसला. सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. तूर शेतकऱ्यांच्या घरात येईल अशी अपेक्षा असताना पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याची अपेक्षा होती. त्यातून काही प्रमाणात का होईना, यावर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला असता, मात्र या ठिकाणीही शेतकऱ्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा याकरिता राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पाने पुसण्याचे काम केले. विमा कंपन्यांनी ऐनवेळी शेतकरी वर्गाला काही अटी व नियम लावत वगळले व स्वतः चा कोटींचा लाभ करून घेतला. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाने पीकविमा उतरवण्याकडे पाठ फिरवली आहे.

...............

मानाेरा येथेही शेतकऱ्यांची पाठ

मानोरा : गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. त्याची कास्तकारांना नुकसानभरपाई मिळाली नाही. तसेच शेतकऱ्यांना कोणताही लाभ देण्यात आला नााही. त्यामुळे यावर्षी अनेक कास्तकार पीकविम्यापासुन दूर आहेत. गेल्यावर्षी कास्तकारांनी कोटी रुपयांचा पीकविमा भरला, मात्र त्यांना पीकविमा देण्यात आला नाही. नुकसान होऊनही पदरात काहीच पडले नसल्यामुळे यावर्षी पीक विमा भरण्यात कास्तकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.