शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नजर पैसेवारी ७0 पैसे!

By admin | Updated: October 9, 2016 01:48 IST

वाशिम जिल्हा प्रशासनाने काढलेली खरिप हंगामाची पैसेवारी अन्यायकारक असल्याचा शेतक-यांचा सूर!

वाशिम, दि. 0८- चालू खरिप हंगामातील नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ७0 पैसे काढण्यात आली आहे. दरम्यान, अधिक पावसामुळे हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबिनसोबतच उडीद, मूग या पिकांपासूनही नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेली पैसेवारी अन्यायकारक असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून उमटत आहे.जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीमध्ये वाशिम तालुक्याची पैसेवारी ७१ पैसे, मंगरूळपीर तालुक्याची पैसेवारी ७0 पैसे; तर रिसोड, मानोरा मालेगाव आणि कारंजा तालुक्याची पैसेवारी ६९ पैसे दाखविण्यात आली असून जिल्ह्यातील सर्वच ७९३ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात २0१३ ते २0१५ अशा सलग तीन वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी मोठा दुष्काळ भोगला. यावर्षी प्रारंभी चांगला पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबिनची अपेक्षित वाढ झालीच नाही. अशातच ऐन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबिनचे मोठठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. उडिद आणि मूग पिकापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकरी केवळ १ ते १.५ क्विंटलचे उत्पन्न मिळाले; तर अधिकच्या पावसामुळे बाधीत झालेल्या सोयाबिनपासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पन्न मिळाले तरी खूप होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सोंगणी आटोपल्यानंतर सुड्या मारून ठेवलेले सोयाबिन देखील भिजल्याने त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे बाजारपेठेत टाकल्यानंतर खराब झालेल्या सोयाबिनला अपेक्षित दर मिळणार नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने कुठल्या आधारे ५0 पैशांपेक्षा अधिक पैसेवारी काढली, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. दुष्काळ निवारण मदतीपासून शेतकरी वंचित२0१५-१६ मध्ये खरिप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या ४४ पैशाच्या अंतीम पैसेवारीवरून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला. मात्र, शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेली दुष्काळ निवारण मदत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशातच यावर्षी अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील अधिकांश गावांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने दुष्काळ निवारण मदत विनाविलंब द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्हा प्रशासन निश्‍चितपणे शेतकर्‍यांच्या सोबतच आहे. सद्या काढण्यात आलेली खरिप हंगाम नजर अंदाज पैसेवारी शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या आधारावर काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष हाती आलेल्या उत्पन्नाच्या आधारे अंतीम पैसेवारी काढण्यात येईल. ती अर्थातच उत्पन्न कमी आल्यास कमीच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी निश्‍चिंत राहावे.- राहुल व्दिवेदीजिल्हाधिकारी, वाशिमशेतकरी म्हणतात-नजर अंदाज पैसेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालीन असून ती शेतकर्‍यांबाबत अन्यायकारक आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात अधिकच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत अगदीच कमी उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी अत्यंत चुकीची आहे.- सुभाष देव्हडे, शेतकरी, दुबळवेलकुठे पावसात प्रदिर्घ खंड; तर कुठे अतवृष्टीसारखी स्थिती उद्भवल्याने खरिप हंगामातील सर्वच पिकांना यंदा जबर फटका बसला आहे. अशा बिकट स्थितीत प्रशासनाने शेतकर्‍यांच्या सोबत असायला हवे. वाशिमचे जिल्हा प्रशासन मात्र शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे.- सुभाष नानवटे, शेतकरी, दोडकी