शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पाणी पुरवठा योजनांचे देयक अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

............... आर्थिक मदत करण्याची मागणी वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन ...

...............

आर्थिक मदत करण्याची मागणी

वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानाचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

.................

अनसिंग येथे प्लास्टिक बंदीचा फज्जा

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागातही नियमांची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

................

मेडशी येथे रुग्णांची झाली सोय

वाशिम : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याला नीति आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका मिळाल्या. मेडशीलाही रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची सोय झाली आहे.

....................

मानोरा क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रलंबित

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मैदानी खेळ बंद आहेत. यामुळे खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे येथील व्यापारी संकुल उभारण्याचा प्रश्नही प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

.................

दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

रिसोड : हृदयरोग, किडनी व कर्करोग, आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०२० मध्ये २७ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधिताना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

................

‘त्या’ अधिनियमाच्या अंमलबजावणीची मागणी

वाशिम : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजवणी करण्यात यावी, अशी मागणी येथील दिव्यांग लाभार्थींनी सोमवारी केली.

............

किन्हीराजा येथे आरोग्य तपासणी

वाशिम : किन्हीराजा येथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यासोबतच आरोग्य विभागाने रविवारी गावात नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

..................

स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

..............

मास्कचा वापर करण्याकडे विशेष लक्ष

वाशिम : कोरोनाचा आलेख वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. विशेष बाब म्हणजे काही नागरिक डबल मास्क लावतानाही आढळत आहेत.

..................

कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या!

वाशिम : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस बळावत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठलीच हयगय न बाळगता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

...................

विशेष पथकांकडून देयकांकडे लक्ष

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या देयकांवर स्वतंत्र पथक लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

...............

ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा कायम

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अडकलेल्या अधिकांश रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. यामुळे मागणीमध्ये वाढ झाल्याने सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, घरीच उपचार घेत असलेल्या विविध दुर्धर आजारांमधील रुग्ण सिलिंडर मिळत नसल्याने हैराण झाले आहेत.

........................

बांधबंदिस्तीच्या कामांना वेग

उंबर्डा बाजार : कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणलोट विकास योजनेंतर्गत शेतशिवारांमध्ये बांधबंदिस्तीची कामे सध्या वेगात सुरू आहेत.