शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आऊटडेटेड’ रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:41 IST

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. या तुलनेने केवळ २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १५३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. ...

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. या तुलनेने केवळ २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १५३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आजमितीस रुग्णवाहिका देण्यात आलेल्या आहेत. यासह नव्याने मिळालेल्या सात रुग्णवाहिकाही रुग्णसेवेत कार्यान्वित झाल्या आहेत. असे असले तरी वनोजा, मोहरी, मेडशी, शेलुबाजार यासह इतरही काही प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे असलेल्या रुग्णवाहिका २००४ व २००७ च्या आहेत. त्या आज रोजी ‘आऊटडेटेड’ झाल्या असून, टायर पंक्चर होणे, टायर फुटणे, वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार बळावले आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.

यासंदर्भात काही शासकीय रुग्णवाहिकांच्या चालकांशी संपर्क साधला असता, जुन्या झालेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका दुरुस्तीकरिता अमरावतीला जावे लागते. त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागत असल्याने तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध नसते, असेही संबंधित रुग्णवाहिकांचे चालक म्हणाले.

...........................

बॉक्स :

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव

जिल्ह्यात जेमतेम २५ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. त्यातील केनवड, किन्हीराजा, शेलूबाजार, आसेगाव, शेंदूरजना या काही केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत ‘हेल्थ अ‍ँड वेलनेस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे; तर २२ केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. असे असले तरी आरोग्यविषयक सुविधांचा अभाव असून, रुग्णांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

..................

बॉक्स :

जिल्हा रुग्णालयात रोज ६५ रुग्ण रेफर

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णांना पुढील उपचारांसाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. हे प्रमाण दररोज सरासरी ६५ ते ७० पर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...................

रुग्णवाहिकांना नादुरुस्तीचे ग्रहण

ग्रामीण भागातून जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रामुख्याने प्रसूतीत अडचणी निर्माण झालेल्या गर्भवती मातांना ‘रेफर’ करण्यात येते. अधिकांश रुग्णवाहिकांना नादुरुस्तीचे ग्रहण लागले असून, प्रवासादरम्यान रुग्णवाहिका बंद पडल्यास गर्भवती मातांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.

.................

रुग्णवाहिकेचाच विमा नाही

सर्व प्रकारच्या वाहनांचा विमा उतरविणे शासनस्तरावरून बंधनकारक करण्यात आले आहेत. असे असताना रुग्णवाहिकांचा विमा उतरविण्याकडे शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. अपघातच होत नाही; तर विमा कशाला काढायचा, असे शासनाचे म्हणणे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.