शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते होणार संपात सहभागी

By admin | Updated: May 29, 2017 01:20 IST

विविध प्रकारच्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी येत्या ३० मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध प्रकारच्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी येत्या ३० मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते सहभागी होत असल्याची माहिती केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स, ड्रग्ज, झोपेचे औषध, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधींची विक्री केली जात असल्याचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मात्र, या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासह केंद्र शासनाच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटिसलाही औषध विक्रेता संघटनेचा विरोध असल्याने ३० मे रोजी हा संप पुकारण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्वच अर्थात ५५० औषध विक्रेते या संपात सहभागी होत असून, २९ मे च्या मध्यरात्रीपासून हा संप सुरू होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.