शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवीत उसळला जनसागर!

By admin | Updated: July 10, 2017 02:05 IST

गुरुपौर्णिमा उत्साहात : हजारो शिष्यांनी टेकविला गुरुचरणी माथा

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे हजारो शिष्यांनी गुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या चरणी माथा टेकून महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त ९ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावली.यावेळी जय सेवालाल, जय संत रामराव महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमा दिनी ९ जुलै रोजी संत डॉ. रामराव महाराज यांच्या हस्ते माता जगदंबा, जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘शिरा’ या गोड पदार्थ प्रसादाचा भोग देऊन आपला जन्मसोहळा साजरा केला. यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांनी जय सेवालाल, जय संत रामराव महाराजांचा गजर करीत एकच जयघोष केला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांना आशीर्वाद देताना संत रामराव महाराजांनी संदेश दिला. या संदेशात त्यांनी मार्गदर्शन केले की, आई भवानी, संत सेवालाल सजीव सृष्टीला सुखी ठेव, पाऊस पडू दे, अशी आराधना केली. यावर्षी पिकांचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून येत्या ३ दिवसात सर्वदूर पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले. सर्वांनी खेळीमेळीने बंधू व समान भावनेने आनंदाने वागावे, असे संदेशात म्हटले.गुरुपाौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आयोजकांसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सेवाआश्रम प्रांगणात हजारो भाविकांनी रांगेने बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गुरूच्या भेटीला देशभरातील कानाकोपऱ्यातील हजारो भक्तांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला हजेरी लावली. गुरुपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी पालकमंत्री ना. संजय राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, भारतीय बंजारा क्रांतिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई, देवीदास राठोड, दिलीप जाधव, देवीसिंग पवार, मुंबईचे मंगलभाई राठोड, औरंगाबादचे अ‍ॅड.बी.डी. पवार, साई राठोड, सज्जन राठोड, अनिल राठोड, इंजिनिअर रमेश पवार, कर्नाटकचे आमदार उमेश जाधव आदींची उपस्थिती होती. पायदळ दिंड्यांनी वेधले भाविकांचे लक्ष देशभरातील हैद्राबाद, कर्नाटक , तेलंगणा व जालना जिल्ह्यातील गुलखंड, पाटोदा, परतूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, जिंतुर, यासह यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील पायदळ दिंड्या या गुरुपौर्णिमेला काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल झाल्या होत्या. या दिंड्यांमध्ये जय सेवालाल, बोलो जय सेवालाल आदींचा गजर करण्यात आला. कानाकोपऱ्यातून आलेल्या या पायदळ दिंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जय सेवालालचा गजर करीत ढोलताशांच्या निनादात नृत्य करून जयघोष करण्यात आला.