वाशिम : येथील ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार पद गेल्या महिनाभरापासून रिक्त होते. या पदावर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी संजय परदेशी यांची २६ जुलै रोजी नियुक्ती केली. वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन गवळी यांना अडोळी येथील प्रकरण व्यवस्थित हाताळता न आल्याने त्यांची मुख्यालयात रवानगी करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर व श्रीराम पवार यांची नियुक्ती होण्याचे संकेत होते. मात्र, ऐनवेळी पोलिस निरीक्षक संजय परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली.
वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी परदेशी
By admin | Updated: July 28, 2014 01:51 IST