शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पंचायत समितीत पेपरलेस प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST

वाशिम तालुका पेपरलेस व्हावा, त्यायोगे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी पेपरलेस कामकाजाचे महत्त्व प्रशिक्षकांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत आवश्यक असलेली माहिती ...

वाशिम तालुका पेपरलेस व्हावा, त्यायोगे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी पेपरलेस कामकाजाचे महत्त्व प्रशिक्षकांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत आवश्यक असलेली माहिती तत्काळ मिळाली पाहिजे. अनेक वेळा कागदपत्रे जमा करण्यासाठी ग्रामसेवकांचा बराच वेळ खर्ची जातो. परंतु प्रशासनाच्या निडली ॲपचा उपयोग करताना केवळ एका क्लिकच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे मिळून त्यांचा वेळ वाचू शकतो. यासाठी प्रशिक्षक भुतडा यांनी निडली ॲपच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज कसे करावे याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखविले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला पं.स. गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, वाशिम पंचायत समितीमधून सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद गोदारा, तालुकाध्यक्ष दीपक खडसे, संगणक परिचालक संघटनेचे वाशिम अध्यक्ष शेखर हिरगुडे यांची उपस्थिती होती. तर ग्रामसेवक संघटनेचे वाशिम अध्यक्ष गणेश इढोळे, तालुका व्यवस्थापक नंदू इढोळे यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व संगणक परिचालक यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता. आता प्रत्यक्ष पेपरलेस प्रशासनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

--------

पुणे येथील प्रशिक्षकांनी दिले प्रशिक्षण

सर्व प्रशासकीय काम पेपरलेस होण्यासह जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांच्या पुढाकारातून आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे येथील प्रशिक्षक भुतडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच प्रशासनाच्या गुगल मिटव्दारे निडली ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.