..............
पथदिवे उशिरांपर्यंत राहताहेत सुरू
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी परिसरातील पथदिवे सकाळी उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. यामुळे विजेचा अपव्यय होत असून याकडे नगर परिषदेने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
....................
पोलीस वाहनांचे सायरन कर्णकर्कश
वाशिम : रात्रगस्त घालण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी नवीन दुचाकी वाहने मिळाली आहेत. त्यावर लावण्यात आलेले सायरन मात्र कर्णकर्कश असून दिवसा हे सायरन वाजवू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
...............
अवैध रेती वाहतुकीवर नजर
वाशिम : शहर परिसरातून अवैधरित्या होत असलेली रेती वाहतूक तत्काळ थांबवा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा तहसीलदार विजय साळवे यांनी दिला आहे. अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे ते म्हणाले.
..............
झाडांच्या अनावश्यक फांद्यांची कटाई
वाशिम : महावितरणच्या चमुकडून शहरात मान्सूनपूर्व कामे केली जात असून याअंतर्गत शुक्रवारी वीज तारांच्यामध्ये येणाऱ्या झाडांच्या अनावश्यक फांद्यांची कटाई करण्यात आली.