शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पानटपरी फोडून ४८ हजारांचा माल लंपास

By admin | Updated: January 10, 2017 02:41 IST

धाड येथील घटना

धाड, दि. ४- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक पानटपरी फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४८ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना ८ जानेवारी रोजी रात्री घडली. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही चोरीची घटना घडली आणि अशा प्रकारची घटना घडण्याची साधारण चौथी वेळ आहे. परिणामी व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. याठिकाणी चौकात पानटपरी, चहा, इले., कृषी केंद्र, किराणा व इतर व्यावसायिकांची दुकाने आहेत. या ठिकाणी म.नदिम म.अलीम यांची अमन पान सेंटर नावाची पानटपरी आहे. ८ जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करून घरी गेल्यानंतर सकाळी नेहमीच्या वेळी टपरी उघडण्यास आले असता त्यांना चोरी झाल्याची घटना समजली. त्यांचे लगत असणार्‍या म.जाकीर यांचे चहाचे दुकानातून लाकडी फळ्या तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळवत पानटपरीची मागील बाजू फोडत पानटपरीतील महागडे सिगारेट, विडी, तंबाखू, मसाला, असा ३१ हजार ८५0 रुपयांचा माल व रोख १६ हजार असा ४७ हजार ८५0 रु पयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला.