ठळक मुद्दे‘सर्व्हर डाउन’च्या समस्येमुळे रात्र-रात्र जागून काढावी लागत आहेखंडाळा, बोराळा, ढोरखेडा, कोठा, वाघी ये थील शेतकर्यांना अर्ज भरण्याकरिता बोराळा येथे सोय
लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा: कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ‘सर्व्हर डाउन’च्या समस्येमुळे ग्रामस् थांना रात्र-रात्र जागून काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील खंडाळा, बोराळा, ढोरखेडा, कोठा, वाघी ये थील शेतकर्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याकरिता बोराळा येथे सोय करण्यात आली आहे; मात्र, ‘नेट कने िक्टव्हिटी’चा प्रश्न गंभीर झाल्याने सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंतही अर्ज दाखल करणे अशक्य ठरत आहे. ‘नेट कनेक्टिव्हिटी’ सुरळीत झाली की अर्ज भरता येत आहे; पण त्यासाठी संबंधित शेतकर्यांना रात्रभर जागरण करावे लागत असल्याचे दिसत आहे.