शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जादा भारनियमनाने नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:41 IST

आसेगाव पो.स्टे. - मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पो.स्टे. परिसरातील १५ गावांत जादा भारनियमन सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्दे१४ तासांचे भारनियमन आसेगाव उपकेंद्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. - मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पो.स्टे. परिसरातील १५ गावांत जादा भारनियमन सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.आसेगाव येथील ३३ केव्ही विद्युत  उपकेंद्रांतर्गत वारा जहॉगीर फिडरवरून पिंपळगाव, आसेगाव, वारा जहॉगीर, कुंभी, लही, वसंतवाडी तसेच देपूळ व धानोरा फिडरवरून नांदगाव, आसेगावचा काही भाग, धानोरा, शिवणी दलेलपूर, चिंचखेडा, शेगी फिडरवरून चिंचोली, दाभडी, रामगड, शेगी, भडकुंभा आदी गावांत वीजपुरवठा केला जातो. या तिन्ही फिडरवर आता दिवसा ९ आणि रात्री ५ असे एकूण १४ तास भारनियमन घेतले जात आहे. कधी यामध्ये कपातही केली जाते. एकंदरित १० ते १४ तासाचे वीज भारनियमन घेतले जात असल्याने नागरिक वैतागले आहेत. आसेगाव परिसरातील १५ गावांची विद्युतविषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ एका लाईनमनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १५ गावाची जबाबदारी सांभाळताना एका कर्मचाºयावरच जादा भार येत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरूस्ती करण्यासाठी प्रचंड विलंब लागतो. कर्मचाºयांची संख्या वाढविणे गरजेचे ठरत आहे.असे आहे भारनियमन ...!वारा जहॉगीर फिडर - सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी सकाळी ५ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि रात्री ७ ते १२ या वेळेत भारनियमन घेतले जाते.धानोरा व शेगी फिडर - सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि रात्री ७ ते १२ या वेळेत तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी ५ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० या वेळेत भारनियमन घेतले जाते.