शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

९० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शाळेच्या घंटेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात ...

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, अशाप्रकारे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आधी कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती घेऊन त्या ग्रामपंचायतींना शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेण्याच्या सूचना केल्या जातील. ग्रामपंचायतींची तयारी असेल, तरच संबंधित गावांतील ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळा उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे.

------------------

एका बाकावर बसणार एकच विद्यार्थी

कोरोनामुक्त ग्रामपंचायतींनी ठराव घेतल्यानंतर ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू केल्यास या शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बाकावर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच त्यांना सतत हात धुवावे लागतील.

------------------

आसन क्षमतेमुळे वर्गाचे विभाजन

कोरोनामुक्त गावांत ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करताना वर्गातील आसन क्षमता कमी करून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांहूनही कमी राहण्याची शक्यता असल्याने वर्गाचे विभाजन करावे लागणार असून शिक्षकांना एकाच वर्गासाठी एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक तासिका दरदिवशी घ्याव्या लागणार आहेत.

------------------

बॉक्स : ८ वी ते १२ वीच्या शाळा - ३६२,

बॉक्स : ८ वी ते १२ वीचे विद्यार्थी - ९९०९५

------------------

८ ते १२ वर्गनिहाय विद्यार्थी

वर्ग - विद्यार्थी

आठवी - २०५००

नववी - २०७००

दहावी - १९७१५

अकरावी - १९००५

बारावी - १८१७५

-------------

कोट : कोरोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या निर्णयाची माहिती आहे. आम्हांला अधिकृत सूचना नाहीत; परंतु, या निर्णयानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती संकलित करण्याचे काम आमच्या स्तरावर सुरू करण्यात आले आहे.

-रमेश तांगडे,

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

जि. प. वाशिम