शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पंचायत समितीला कुलूप ठोकू!

By admin | Updated: April 28, 2017 01:40 IST

सभापती, उपसभापतींनी दिला इशारा : प्रभारींमुळे विकासकामे खोळंबली

मंगरुळपीर : स्थानिक पंचायत समितीचा कारभार सद्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने विविध विकासकामांचा पुरता फज्जा उडत आहे. त्यामुळे विनाविलंब कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा; अन्यथा २ मे रोजी पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकू, असा निर्वाणीचा इशारा सभापती निलीमा देशमुख, उपसभापती सागर खोडके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गुरूवारी सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. गत अनेक दिवसांपासून मंगरूळपीर पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभारी गटविकास अधिकारी हे कित्येक दिवसांपासून कार्यालयात आलेच नाहीत. त्यातच सद्या सर्वत्र पाणीटंचाईचे सावट असून याबाबत पंचायत समिती स्तरावर कुठलीही उपाययोजना नाही. मग्रारोहयो, सिंचन विहीरी, दलीत वस्तीची कामे, घरकुलांची कामे यामुळे रखडली असून कुणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचारीही निर्ढावले आहेत. कार्यालयातील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच राहत असून दांडीबाज कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत वरिष्ठांना अवगत करुनही ते चुप्पी साधून आहेत. एकूणच या सर्व समस्यांमुळे संतप्त झालेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्या; अन्यथा २ मे रोजी पंचायत समितीला कुलूप ठोको आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.