अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या जागेत राहतात पण त्यांच्याकडे आठ अ नाही, अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता, या लोकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना घरकूल मिळावे अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र पवार यांनी १५ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली हाेती. त्याची दखल घेत पालकमंत्री यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अतिक्रमण नियमानुकूल करुन प्रलंबित घरकुलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काय कार्यवाही करता येऊ शकते यावर विचारणा करुन त्यावर एक महिन्याच्या आत हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित घरकुलाचे काम मार्गी लागणार आहे. तसेच मानोरा तालुक्यातील आरोग्य, रस्ते, पूल व विविध विकासकामांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले हाेते, अशी माहिती मानोरा शिवसेना प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र पवार यांनी दिली.
अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST