शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

धामणी ग्रामपंचायतच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 20, 2015 01:56 IST

मानोरा तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी ; १६ एप्रिलपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती.

वाशिम : मानोरा तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी ८ एप्रिल रोजी काढल्याने, मानोरा गटविकास अधिकार्‍यांमार्फत १६ एप्रिलपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. पंचायतीचा ठराव न घेता मालकी हक्काची नोंद करणे तसेच पंचायतला विश्‍वासात न घेता बांधकाम परवानगी देणे व धामणी ग्रामपंचायतच्या इतर कामकाजाची चौकशी करण्याची मागणी मंगला भगत व इतर तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मानोरा पंचायत समितीकडे २३ एप्रिल २0१४ रोजी केली होती. यानुसार मानोरा गटविकास अधिकार्‍यांनी तक्रारीची शहानिशा केली असता, मालकी हक्काची नोंद कुठल्या ठरावानुसार व तारखेत देण्यात आली याबाबत ग्रामपंचायत दप्तरी दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे तसेच पंचायतीचा ठराव न घेता मालकी हक्काची नोंद करणे, पंचायतीस विश्‍वासात न घेता बांधकामाची परवानगी देणे आदी प्रकरणी तत्कालीन सचिव व सरपंचांवर गटविकास अधिकार्‍यांनी ठपका ठेवला होता. सदर प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या दालनात पोचले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी सखोल चौकशीचे आदेश ८ एप्रिल रोजी दिले. ग्रामपंचायत धामणी येथील नमुना ८ रजिस्टरला बोगस व खोट्या नोंदी घेण्यात आल्याची सखोल चौकशी करणे, जमा-खर्चाची चौकशी जि.प. वाशिम स्तरावरून पूर्ण होईपर्यंंंंत ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये कोणत्याही नवीन नोंदी न करणे तसेच ग्रामपंचायतच्या खात्यामधून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार किंवा खर्च न करणे आदी निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी ८ एप्रिल २0१५ रोजी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. यानुसार गटविकास अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली आहे.