शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दराअभावी संत्रा उत्पादक शेतकरी संकटात!

By admin | Updated: March 22, 2017 02:57 IST

दरात ७0 टक्के घसरण; चलन तुटवड्याचा परिणाम.

निनाद देशमुख रिसोड, दि. २१- केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांपासून विस्कळीत झालेले किरकोळ व्यवहार सुरळीत होत असले तरी, संत्रा उत्पादकांना मात्र या निर्णयाचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत संत्र्याच्या दरात तब्ब्ल ७0 टक्क्यांची घट झाली असून, चांगल्या दर्जाच्या संत्र्यालाही खरेदीदार मिळेनासे झाले आहेत.जिल्हय़ात वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा व रिसोड तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी सत्र्यांचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मंगरुळपीर, कारंजा व रिसोड तालुक्यात आहे. रिसोड तालुक्यात जवळपास १५0 हेक्टर बागायती क्षेत्रात संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. एकट्या शेलगाव येथे १0 ते १५ शेतकर्‍यांनी संत्र्याची लागवड केली आहे. वर्षातून दोनदा येणार्‍या संत्र्याला सुरुवातीला नोटाबंदी व आता कॅशलेस व्यवहाराचा जोरदार फटका बसला आहे. मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. कारंजा तालुक्यात १५0 च्यावर शेतकर्‍यांच्या संत्र्याच्या बागा आहेत. आंबिया बहराला पाहिजे तशी किंमत मिळाली नसल्यामुळे मृग बहराच्या संत्र्यातून नुकसान भरून काढता येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते; परंतु नोटाबंदीच्या निर्णयानंतर शासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांना संत्राबागा खरेदीचा मोबदला रोखीने देण्यात असर्मथ ठरत आहेत. गतवर्षी पाचशे रुपये प्रति दराने विकले जाणारे संत्राफळाचे कॅरेट आता केवळ शंभर ते दीडशे रुपये दराने विकावे लागत आहे. संत्र्याला व्यापार्‍यांकडून भाव मिळत नसल्यामुळे, शेतकर्‍यांना स्वत: बाजारात विक्रीसाठी धाव घ्यावी लागत आहे. मागील वर्षी संत्र्याला चांगला भाव मिळत होता. यंदा मात्र नोटाबंदीमुळे दरात घसरण झाली आहे. पाचशे रुपयांचे कॅरेट शंभर ते दीडशे रुपयाला विकले जात आहे. प्रतवारी चांगली असली तरी, रोख पैशांअभावी खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत. - नामदेव वाघशेतकरी शेलगाव (रिसोड)