शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी

By admin | Updated: May 29, 2017 01:22 IST

जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख : तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत आयोजित तीन दिवसीय रानमाळ महोत्सव २०१७ चे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव, करडा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एल. काळे, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य माणिकराव देशमुख, नीलेश पेंढारकर, विठ्ठल आरु उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाल्या, की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘रानमाळ’सारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तालुका स्तरावरही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार भावना गवळी म्हणाल्या की, शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित ‘रानमाळ महोत्सव’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा शेतमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. शेतमालावर प्रक्रिया, बीजोत्पादन करण्याचे काम अनेक शेतकरी उत्पादक गट करीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.