शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मोकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात नऊ प्लाॅट हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:49 IST

Washim News : खुल्या प्लाॅटवर कोण, कधी ताबा करून हडपेल काहीच सांगता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी खुला प्लाॅट घेतला जातो; मात्र तो सांभाळणे गेल्या काही वर्षांत कठीण झाले आहे. खुल्या प्लाॅटवर कोण, कधी ताबा करून हडपेल काहीच सांगता येत नाही. गेल्या वर्षभरात अशाप्रकारे प्लाॅट हडपल्याच्या नऊ तक्रारी झाल्या.खुल्या प्लाॅटवर अनधिकृत पद्धतीने ताबा केल्यानंतर मूळ मालकाने तक्रार केल्यास ताबा सोडण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे मोकळा प्लाॅट सांभाळणे कठीण बाब झाली असून मूळ मालकांना  प्लाॅटच्या चारही बाजूंनी अतिक्रमण करू नये, असा फलक लावावा लागत आहे. 

एकच प्लाॅट अनेकांना विकलावाशिम शहरातील काही भागात एकच प्लाॅट अनेकांना विकल्याचा प्रकार यापुर्वी घडलेला आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांत वाशिम नगर परिषदेकडे मूळ मालकांनी तक्रार दाखल केली; मात्र या धंद्यात पारंगत असलेल्या भूखंड माफियांनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे अनेकांना न्याय मिळालेला नाही.

प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी  प्लाॅटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खंबे गाडून तार कुंपन करून घेणे आवश्यक ठरत आहे. यासह पक्की नोंदणी करणेही गरजेचे ठरत आहे.  याशिवाय प्लाॅटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लाॅटवर कोणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो, असे वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सांगितले.

प्लाॅट परस्पर हडपण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यासंदर्भात तक्रार झाल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केला जातो. प्लाॅटच्या मूळ मालकांनीही सतर्क राहायला हवे.- धृवास बावनकर, ठाणेदार, वाशिम

प्लाॅट खरेदीसाठी लाखो रुपये गुंतविल्यानंतर प्लाॅटचा सांभाळ करणेही गरजेचे आहे. त्यानुषंगाने पक्की नोंदणी करून घेणे, प्लाॅटला तार कुंपन करणे, त्याठिकाणी मूळ मालकांच्या नावाचा फलक लावणे अशा काही महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष पुरवायला हवे.- विजय साळवे, तहसीलदार, वाशिम

टॅग्स :washimवाशिम