शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ दोन ‘ॲक्टिव्ह’; कोरोना होतोय ‘डिॲक्टिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

वाशिम : कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांनी जिल्हाभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. मध्यंतरीच्या काळात या संकटाची व्याप्ती झपाट्याने वाढल्याने ...

वाशिम : कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांनी जिल्हाभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. मध्यंतरीच्या काळात या संकटाची व्याप्ती झपाट्याने वाढल्याने प्रत्येकजण हैराण होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख शून्याकडे घसरत असून २२ सप्टेंबरला उपचार घेत असलेल्या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला; तर आता केवळ दोघांवर उपचार सुरू आहेत. यावरून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या पहिल्या लाटेत बाधितांचा एकूण आकडा ७ हजार ४३० वर पोहोचला. या कालावधीत १५८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता तुलनेने अधिक राहिली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत बाधितांचा एकूण आकडा आजमितीस ४१ हजार ७४० वर पोहोचला आहे; तर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आकड्याने ६३८ चा पल्ला गाठला आहे.

असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटाचे ढग झपाट्याने हटत असल्याची समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन बाधित आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आलेखही खालावला असून एकही नवा रुग्ण निष्पन्न होत नसल्याचे दिवसही वाढलेले आहेत. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार यापूर्वी उपचार घेत असलेल्या ५ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला; तर नव्याने एकही रुग्ण निष्पन्न झाला नाही. त्यामुळे सध्या केवळ दोन व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यांच्यातही विशेष लक्षणे नसल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यक्तीही लवकरच डिस्चार्ज होऊन घरी परतणार असल्याची माहिती आहे.

.........................

कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांचा लेखाजोखा

पहिल्या लाटेत आढळलेले बाधित - ७४३०

पहिल्या लाटेत झालेले मृत्यू - १५८

दुसऱ्या लाटेत आढळलेले बाधित - ३४३१०

दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यू - ४८०

.................

कोरोना संसर्गाची सद्य:स्थिती

दोन्ही लाटांमध्ये एकूण पॉझिटिव्ह – ४१७४०

दोन्ही लाटांमध्ये एकूण डिस्चार्ज – ४१०९९

आतापर्यंत झालेले कोरोनाने मृत्यू - ६३८

सध्या ‘ॲक्टिव्ह’ असलेले रुग्ण – २

...............

कोट :

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या संकटाची व्याप्ती पूर्णत: कमी झालेली आहे. दैनंदिन केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधून अहवाल ‘निगेटिव्ह’ येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आजमितीस केवळ दोन रुग्ण उपचाराखाली असून त्यांच्यातही विशेष लक्षणे नसल्याने त्यांना लवकरच ‘डिस्चार्ज’ देण्यात येईल. संकट निवळले आहे; पण संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे सुरूच ठेवावे.

- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम