मानोरा (जि. वाशिम), दि. २१- शहरातील राठी नगर येथील डॉ.धनंजय राठोड यांच्या घरात २0 सप्टेंबर रोजी नोकर सुनील अरविंद जाधव मानोरा याने ४ लाख ४१ हजार रुपये किमतीच्या दागिण्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल केला. डॉ. धनंजय राठोड यांच्या घरी कामाला नोकर असलेल्या आरोपी सुनील जाधव याने फिर्यादीच्या घरातील लाकडी कपाटातून चावी काढून ८ तोळे सोन्याच्या बांगड्या, चार तोळे सोन्याची पोत, नगदी ६५ हजार व पॅन्टच्या खिशातून २४ हजार रुपये असे एकूण ४ लाख ४१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता, २३ सप्टेंबर पर्यंत पीसीआर मिळाला.
नोकरानेच केली दागिण्यांची चोरी
By admin | Updated: September 22, 2016 01:22 IST