शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निगेटिव्ह अहवाल असेल तरच जाता येणार आरटीओ कार्यालयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

वाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता अर्जदाराच्या प्रतिनिधींना प्रवेश नसून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात ...

वाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता अर्जदाराच्या प्रतिनिधींना प्रवेश नसून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना ॲंटीजन चाचणी करुन ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय प्रवेश देण्यात येणार नाही.

राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजता पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत सूचना आणि निर्देश जारी केले आहे. त्याच अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथील कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. अभ्यागतांना तसेच अर्जदारांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना सकाळी १० ते दुपारी २ वाजता दरम्यान ॲंटीजन चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.

कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.ए. हिरडे यांनी दिला.

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रुव्ह केलेले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहणार आहे.

वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद घेणे,कमी करणे आदी प्रकरणी वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करीत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने सदर कामकाजासाठी कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. आवश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवाना विषयक कामकाज सुरु राहील. शिकावू अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती विषयी कामकाज बंद राहील. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन हिरडे यांनी केले.

००

बाॅक्स

अंमलबजावणी विषयक कामकाज

अंमलबजावणी पथक रस्ता सुरक्षेशी निगडीत वाहनांची तपासणी करतील. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करण्यात येईल. सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत जारी केलेल्या सूचनेप्रमाणे होत असल्याची खातरजाम करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे चालू राहील. जिल्हाधिकारी वाशिम यांनी वेळोवेळी आदेशित केल्याप्रमाणे प्रवाशांची गर्दी करुन वाहतूक करणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कार्यवाही करण्याचे काम करतील.