शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दोन तालुक्यांत केवळ पाच बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST

....................... बँकेतील गर्दीवर मिळाले नियंत्रण वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खातेदारांच्या बॅंक खात्यांच्या शेवटच्या क्रमांकानुसार दैनंदिन ...

.......................

बँकेतील गर्दीवर मिळाले नियंत्रण

वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खातेदारांच्या बॅंक खात्यांच्या शेवटच्या क्रमांकानुसार दैनंदिन व्यवहार करण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी केली जात असल्याने बॅंकेतील गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.

..................

लस घेऊन सुरक्षित होण्याचे आवाहन

वाशिम : तालुक्यात सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी शुक्रवारी केले आहे.

......................

डिझेलचे दर कमी करण्याची मागणी

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर असून, बियाणे, खत आणि कीटकनाशक खरेदी करून ते आपापल्या गावी नेले जात आहे. अशात डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी होत आहे.

.............

गावठाण सर्वेक्षण कामास ‘ब्रेक’

वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले; मात्र कोरोना संकटामुळे त्यास ‘ब्रेक’ लागला आहे.

...............

वाशिम तालुक्यात २५ जण पॉझिटिव्ह

वाशिम : शुक्रवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यात विविध ठिकाणचे केवळ २५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धोका कमी होत असला, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

.................

पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

..................

अतिक्रमण प्रस्ताव नियमानुकूल करा

वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली.

..................

आरोग्य विभागाची विशेष मोहीम

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरपालिकेने नाल्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने शुक्रवारी आरोग्य पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.

......................

नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

वाशिम : कोरोनाविषयक नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने विनाकारक फिरणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात येत असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेकडून मिळाली.

...........

रस्त्यांची कामे मार्गी लागणार

वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विशेषत: मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.

........

‘एबी’ केबलमुळे चोरीस आळा

वाशिम : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) वीजचोरीस बहुतांशी आळा बसला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या केबल टाकण्यात आल्याने महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.

................

भंगार वाहनांच्या लिलावाची मागणी

वाशिम : स्थानिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीची अनेक वाहने जागीच भंगार झाली आहेत. या वाहनांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.