शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सवलतीच्या क्रीडा गुणांसाठी केवळ ७० प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

वाशिम : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्यासाठी २१ जूनपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १८ जूनपर्यंत ...

वाशिम : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्यासाठी २१ जूनपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १८ जूनपर्यंत केवळ ७० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्रच सुरू झालेले नसल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचा खेळामध्ये सहभाग होऊ शकलेला नाही. त्यामुळे सन २०२१-२१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यास सन २०२०-२१ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत तसेच सन २०२०-२१ या वर्षात इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी पूर्वी इयत्ता ११ वीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग विचारात घेण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला निर्देश प्राप्त होताच सवलतीच्या गुणांसाठी प्रस्तावांची छाननी करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सन २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे अनुक्रमे इयत्ता ८ वी ते ९ वी मधील खेळाच्या प्रावीण्य प्रमाणपत्राच्या प्रती मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याद्वारा साक्षांकित करून प्रस्ताव दोन प्रतीत २१ जून २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे सादर करणे आवश्यक आहे. १८ जूनपर्यंत केवळ ७० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

000000

दहावीतील एकूण विद्यार्थी - १९७१५

बारावीतील एकूण विद्यार्थी - १८१७५

०००००

बॉक्स

गतवर्षातील क्रीडा सहभाग विचारात घेणार

कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ वीमधील क्रीडा सहभाग विचारात घेण्यात येणार आहे तसेच दहावीसाठी इयत्ता आठवी आणि नववीमध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येणार आहे.

००००

कोट बॉक्स

सवलतीच्या क्रीडा गुणांसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून २१ जूनपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. २१ जूनपर्यंत प्राप्त प्रस्ताव २५ जूनपर्यंत वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहेत. १८ जूनपर्यंत जवळपास ७० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

- चंद्रकांत उप्पलवार

जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम