शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

सावकारी कर्जातून केवळ ५४१ शेतक-यांची सुटका!

By admin | Updated: August 2, 2016 23:57 IST

सावकारी कर्जमाफी योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील २४ सावकारांच्या बँक खात्यात ८९.८६ लाख रुपये जमा.

संतोष वानखडे / वाशिमसावकारी कर्जमाफीसाठी आलेल्या सुमारे सव्वा तीन हजार प्रस्तावांपैकी केवळ ५४१ अर्ज छानणी त पात्र ठरले. या शेतकर्‍यांवरील कर्जाचा चुकता करण्यासाठी सहकार विभागाने २४ परवानाधारक सावकारांना ८९.८६ लाख रुपये दिले आहेत. गत तीन वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. संसाराचा घरगाडा चालविणे आणि शेती पिकविणे या दोन उद्देशाने शेतकरी बँका, पतसंस्था, अधिकृत सावकार व अनधिकृत सावकारांच्या दारात उभा राहतो. कर्जासाठी बँकांचे दर कमी आहेत. मात्र, प्रक्रिया किचकट असल्याने आणि सात-आठ चकरा मारल्यानंतरही पदरी निराशाच पडत असल्याने अनेकजण खासगी सावकारांकडे कर्जासाठी धाव घेतात. २0१४ मध्ये जिल्ह्यातील ९१७८ कर्जदार सभासदांनी ४३ परवानाधारक सावकारांकडून १0 कोटी ५0 लाखांचे कर्ज काढले होते. २0१४ मध्ये कोरडा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने, शेतकर्‍यांवरील सावकारी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यानुसार, सहकार विभागाने कर्जमाफीचा आदेश काढून ९१७८ पैकी शेतकरी किती याचा शोध घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. जवळपास तीन हजाराच्या आसपास प्रस्ताव प्राप्त झाल्याने प्रथम तालुकास्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर समितीतर्फे छानणी करण्यात आली. सुरूवातीला एकाच तालुक्याची असलेली अट नंतर शिथिल झाल्याने प्रस्तावांच्या संख्येतही किंचितशी वाढ झाली. साधारणत: सव्वा तीन हजार प्रस्तावांपैकी कर्जमाफीसाठी ५४१ प्रस्तावाला जिल्हास्तरीने समितीने मान्यता दिली. ५४१ शेतकरी सभासदांनी ७७.६८ लाख रुपयांचे सावकारी कर्ज काढले होते. या कर्जाचे व्याज १२.१८ लाख झाल्याने एकूण सावकारी कर्जाचा आकडा ८९.८६ लाखावर पोचला. यामध्ये कारंजा तालुक्यातील ३८३ शेतकर्‍यांनी ११ सावकाराकडून घेतलेल्या ५९.२२ लाख रु पयांच्या कर्जाचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील सहा शेतकर्‍यांचे ४२ हजार रुपये कर्ज, रिसोड तालुक्यात ११४ शे तकर्‍यांचे १५.४९ लाखाचे कर्ज, मानोरा तालुक्यात २६ शेतकर्‍यांचे १२.७५ लाख रुपयाचे कर्ज, मंगरुळपीर तालुक्यात चार शेतकर्‍यांचे ९१ हजाराचे कर्ज आिण मालेगाव तालुक्यातील आठ शे तकर्‍यांकडील १.७ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.