शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

३४ पैकी केवळ दोन कोटींचा खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:31 IST

वाशिम : जिल्हा नियोजन समिती अनुदान या अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेला ३४ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाले होते. यापैकी केवळ २ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित ३२ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर या अखर्चित निधीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती अनुदान अखर्चित राहिलेल्या ३२ कोटींचा प्रस्ताव शासनाच्या दरबारात

संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा नियोजन समिती अनुदान या अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेला ३४ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाले होते. यापैकी केवळ २ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित ३२ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर या अखर्चित निधीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेला विकासात्मक कामांसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. या निधी खर्चाचा कालावधीदेखील निश्‍चित करण्यात आलेला आहे. साधारणत: एका वर्षात प्राप्त झालेला हा निधी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याची मुदत असते, असे वित्त व लेखा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे मंजूर निधी हा प्रस्तावित कामांवर खर्च करण्याच्या कार्यवाहीस पहिल्या वर्षात फारशी गती दिली जात नसल्याचे दिसून येते. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हा नियोजन समिती अनुदान या बाबीखाली जिल्हा परिषदेच्या एकूण १0 विभागाला तब्बल ३४ कोटी ६६ लाख ८९ हजार रुपये निधी मिळाला होता, यापैकी केवळ २ कोटी ५८ लाख ३0 हजार रुपयांचा निधी खर्च झाला असून, उर्वरित ३२ कोटी ८ लाख ५९ हजार रुपयांचा निधी हा ३१ मार्च २0१८ पर्यंत खर्च करता येणार आहे. मात्र, शेतकरी कर्जमाफीमुळे हा अखर्चित निधी अपवादात्मक परिस्थितीत शासन केव्हाही परत मागू शकतो, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, लघू सिंचन, बांधकाम व पंचायत, असा नऊ विभागांतर्गतची कामे मार्गी लागण्यासाठी हा निधी मिळालेला आहे. यापैकी केवळ कृषी विभागाने प्राप्त झालेला एकूण १0 लाख रुपयांचा निधी पहिल्याच वर्षात खर्च केला आहे. त्यामुळे कृषी विभागाचा जिल्हा नियोजन समिती अनुदानाचा निधी अखर्चित राहिला नाही. जिल्हा परिषदेला पुरेशा प्रमाणात निधी प्राप्त होत नसतो, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. दुसरीकडे प्राप्त निधी हा मुदतीच्या आत खर्च होईल, याचे सुरुवातीपासूनच नियोजन नसल्याने निधी अखर्चित राहण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोट्यवधी रुपयांचा हा निधी असाच अखर्चित राहिला, तर ग्रामीण भागात विकासाची गंगा कशी वाहणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभेतही मुदतीच्या आत निधी खर्च करण्याबाबत लोकप्रतिनिधींचा आक्रमकपणा दिसून येतो. तथापि, मोठय़ा प्रमाणात अखर्चित निधी राहत असल्याने पदाधिकार्‍यांचा ‘आवाज’ही प्रशासनाला दिरंगाईच्या गाढ झोपेतून जागे करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते.

अखर्चित निधीला जबाबदार कोण?जिल्हा परिषदेला एका वर्षात प्राप्त झालेला निधी हा पुढच्या वर्षातील ३१ मार्चपर्यंत खर्च करता येतो. मात्र, यावर्षी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचा अखर्चित निधी परत मागवून शासन हा निधी कर्जमाफीसाठीदेखील वळता करू शकते, असा अंदाज जाणकारांमधून वर्तविला जात आहे. हा अखर्चित निधी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परत मागितला, तर वाशिम जिल्हा परिषदेला ‘जिल्हा नियोजन समिती अनुदान’ या बाबीखाली मिळालेल्या ३४ कोटी रुपये निधीतून ३२ कोटींचा निधी परत जाऊ शकतो. हा निधी परत गेला, तर याला जबाबदार कोण? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.