शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

By admin | Updated: July 16, 2017 02:18 IST

कर्जमाफीतील गुंतागुंतही कायम : बँकांना अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाचा खरीप हंगाम शेतीसाठी सर्वार्थाने वेगळा राहिला असून, एरव्ही १ जुलैपर्यंंतच पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संपत असताना यंदा मात्र १५ जुलैपर्यंंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफीबाबतही बँकांना शासन स्तरावरून अद्याप स्पष्ट निर्देश नसल्याने अथवा यासंदर्भातील सकरुलर मिळाले नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात ९५0 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जुलै २0१६ पर्यंंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकर्‍यांना तब्बल ८९0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या हंगामाकरिता ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ जुलैपर्यंंत केवळ ३१0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊ शकले. कर्ज वाटपाचे प्रमाण घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नाही. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. अशातच आता राज्य शासनाने सन २00९ पासूनच्या कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी होऊन थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाल्यास ते नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात; परंतु यासंदर्भातील अधिकृत घोषणापत्र जिल्ह्यातील एकाही बँकेला अद्याप प्राप्त झालेले नाही. जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून केवळ कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना २00९ पासून थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसोबतच कर्जमाफीसंदर्भातील गुंतागुंतही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.