शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील केवळ १२ टक्के ज्येष्ठांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ हजार ४१० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला ...

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ हजार ४१० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ११ हजार ३२५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तसेच १,९१० व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी शासकीय केंद्रात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात १ मार्चपासून २५ मार्चपर्यंत केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्त मिळून २९२५७ जणांनी लस घेतली आहे. त्यात ६० वर्षे वयावरील नागरिकांची संख्या २२ हजारांच्या जवळपास आहे. प्रत्यक्षात ६० वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

--------------

जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला साद

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागांतील अनेक रुग्ण कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात काही रुग्ण चिंताजनक परिस्थितीत दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह साधा, ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधुमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तातडीने कोरोना चाचणी करावी, तसेच कोरोनाची लस सुरक्षित असून, ती ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्तांनी घ्यावी, अशी साद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

---------------

चाचणी, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंचांना पत्र

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांतच पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामीण भागांतून कोरोना चाचणी करण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सरपंचांना एक पत्र देऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयाच्या दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सक्रिय करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.