शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ११00 शेतक-यांनी उतरविला पीक विमा!

By admin | Updated: January 14, 2017 01:27 IST

वाशिम जिल्ह्यातील चित्र; कर्जदार शेतक-यांची संख्या ७९४

वाशिम, दि. १३- दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड उदासीनता जाणवून आली. गतवर्षी तब्बल ९ हजार ३५५ शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून, १0 जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंंत केवळ १,११२ शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५00 आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. त्यामुळे खरीप हंगामातील शेतमाल विक्रीतून चालणार्‍या रोखीच्या व्यवहारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंंत ह्यब्रेकह्ण लागला होता. परिणामी, शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली. अशातच जिल्ह्यातील १.५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदार असणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे आणि नव्या नोटांचा ह्यविड्रॉलह्ण देण्यावर शासनाने बंधने लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला. या बँकेत कर्जासाठी अर्ज करूनही अनेक दिवस शेतकर्‍यांना अपेक्षित कर्ज मिळाले नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत (६,९९५) यावर्षी विविध बँकांतून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या केवळ १,१९३ आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या देखील यंदा मोठय़ा प्रमाणात घटली असून, कर्ज घेणार्‍या ७९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ९५ हजार रुपये विमा भरला असून, बिगर कर्जदार ३१८ शेतकर्‍यांनी ७७ हजार ८८१ रुपये विमा रक्कम अदा केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.