शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकूण ज्येष्ठांपैकी केवळ ११ टक्के लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २० मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ हजार ५८९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला ...

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २० मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ हजार ५८९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७२ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर १० हजार ८०२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तसेच १,६१४ व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी शासकीय केंद्रात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात १ मार्चपासून २० मार्चपर्यंत केवळ १० हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. प्रत्यक्षात ६० वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तथापि, लसीकरणाला त्यांचा प्रतिसाद लाभत नसून, अनेक व्यक्ती कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होत आहेत.

------------

जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला साद

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागांतील अनेक रुग्ण कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात काही रुग्ण चिंताजनक परिस्थितीत दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसहह साधा, ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधूमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तातडीने कोरोना चाचणी करावी, तसेच कोरोनाची लस सुरक्षित असून, ती ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्तांनी घ्यावी, अशी साद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

------------

चाचणी, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंचांना पत्र

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांतच पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामीण भागांतून कोरोना चाचणी करण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सरपंचांना एक पत्र देऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयाच्या दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सक्रिय करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

---------

शासकीय लसीकरण केंद्र -४०

खासगी लसीकरण केंद्र - ७

---------

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक- १,८००००

लस घेतलेले ज्येष्ठ नागरिक -१००००

-----------

कोरोना संसर्गाची स्थिती

एकूण पॉझिटिव्ह -१२५८९

अ‍ॅक्टिव्ह - १६१४

बरे झालेले - १०८०२

मृत्यू - १७२