शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा पिकावरील कीड, रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक ...

कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. प्रशिक्षणात दिल्या जाणाऱ्या संत्रा पिकाच्या शिफारशीत पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा तसेच शिफारशीत औषधींचा वापर करूनच पीक संरक्षण करावे व फळ बागायती शेतकऱ्यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करून खर्च कमी करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र काळे यांनी केले. राजेश डवरे यांनी संत्रावर्गीय पिकावरील विविध किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानाचा प्रकार यावर प्रकाश टाकला. तसेच संत्रा पिकावरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेअंतर्गत वनस्पतीजन्य विविध कीटकनाशकांचा वापर, पिवळे चिकट सापळे यांचा वापर, संत्रा पिकावरील फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगांसाठी आमिषाचा वापर, तसेच किडीकरिता लेबल क्‍लेम शिफारशीत कीटकनाशकांचा वापर याविषयी विस्तृत विवेचन केले. त्यांनी संत्रा पिकावरील विविध रोग व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी विवेचन केले. या प्रशिक्षण वर्गात विषय विशेषज्ञ उद्यानविद्या निवृत्ती पाटील यांनीही सहभाग नोंदविला व तांत्रिक सादरीकरणाच्या शेवटी दोन्ही शास्त्रज्ञांनी संत्रा पिकासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या उत्पादन व पीक संरक्षण या विषयीच्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणकतज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्‍कर यांनी केले.