लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या राजु महादेव करवते रा.मालेगाव या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधिश के.के. गौर यांनी २६ सप्टेंबर रोजी सुनावली.मालेगाव येथे १२ सप्टेंबर २०१३ साली घडलेल्या सदर घटनेची फिर्याद पिडीतेच्यावतीने देण्यात आली होती. या तक्रारीनुसार, आरोपी राजू करवते (२५) हा शाळकरी मुलीकडे पाहुन अश्लिल चाळे करीत असे. तसेच घरी कोणी नसल्याचे संधी पाहुन घरात घुसुन पिडीतेचा हात धरुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमुद होते. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरण भादंवी कलम ३५४, अ व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपासानंतर न्यायप्रविष्ठ केले होते. या प्रकरणी न्यायालयाने एकुण सात साक्षीदार तपासले. साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधिश गौर यांनी आरोपी राजु करवते यास १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी सहायक अभियोक्ता पी.एस. ढोबळे यांनी बाजू मांडली.
विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:18 IST
वाशिम - शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या राजु महादेव करवते रा.मालेगाव या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधिश के.के. गौर यांनी २६ सप्टेंबर रोजी सुनावली.
विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास
ठळक मुद्देशाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी सश्रम कारावासाची तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा