शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एकमेका साह्य करणारा अंधाचा ‘चेतन सेवांकुर’ गृप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:25 IST

वाशिम : तालुक्यातील केकतउमरा येथे एकमेकांना साहय करुन आपला उदरनिर्वाह करणारा अंधांचा गृप वास्तव्यास असून ते स्वत: आपला उदरनिर्वाह आपल्या कलाकौशल्यातून करीत आहेत. उद्या १५ आॅक्टोंबर रोजी जागतिक अंध सहाय्यता दिन असून याहीवर्षी त्यांच्यावतिने ‘अंधातर्फे अंधाना रेडिओ’ वाटपाचा कार्यक्रमाचो आयोजन केले आहे.केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचा मुलगा चेतन उचितकर जन्मता ...

ठळक मुद्देउद्या जागतिक अंध सहायता दिन अंधातर्फे अंधाना रेडिओ वाटप

वाशिम : तालुक्यातील केकतउमरा येथे एकमेकांना साहय करुन आपला उदरनिर्वाह करणारा अंधांचा गृप वास्तव्यास असून ते स्वत: आपला उदरनिर्वाह आपल्या कलाकौशल्यातून करीत आहेत. उद्या १५ आॅक्टोंबर रोजी जागतिक अंध सहाय्यता दिन असून याहीवर्षी त्यांच्यावतिने ‘अंधातर्फे अंधाना रेडिओ’ वाटपाचा कार्यक्रमाचो आयोजन केले आहे.

केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचा मुलगा चेतन उचितकर जन्मता अंध आहे. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या गुणामुळे तो महाराष्टÑासह आंध्रप्रदेश, गोवा येथेही प्रसिध्द आहे. जिल्हयात व नजिकच्या जिल्हयातील काही अंधांचा गृप चेतनने तयार करुन विविध उपक्रम राबवून आपल्या गृपचा उदरनिर्वाह करतांना दिसून येत आहे. या कामी त्यांना पांडुरंग उचितकर व त्यांच्या पत्नी गंगासागर उचितकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या सर्व अंधानी मिळून चेतन सेवांकुर आर्केष्टा तयार केला. या माध्यमातून ते लग्न समारंभ, शासनाच्या योजनांची माहिती यासह विविध छोटे मोठे कार्यक्रम घेवून ते त्यामधून मिळत असलेल्या मिळकतीमधून आपला उदरनिर्वाह करतांना दिसून येत आहेत. 

रेडिओ वाटपाचा कार्यक्रम

जीवनात एकमेकाशी संपर्क साधण्याचे, भावना व्यक्त करण्याचे मन जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्द, आवाज. अंध बांधवांचे तर जग जाणुन घेण्याचं हे प्रमुख साधन म्हणून रेडिओ म्हणजे अंधांचा मित्र सखा. अंधांच्या जिवनातील रेडिओचे महत्व तर केवळ अंधच जाणू शकतो. अनेक बांधवांकडे हा रेडिओ सुध्दा उपलब्ध नसतो याची दखल घेवून अंधातर्फे अंधांना रेडिओ वाटप कार्यक्रमाचे १५ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता चेतन सेवांकुर निवास केकतउमरा येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंध चेतन, कैलास, प्रविण, निलेश, अमोल, संदिप, लक्ष्मी, रुपाली, कोमल व चेतन सेवांकुर परिवाराचयवतिने करण्यात आले आहे.